जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२४ । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल सावदा येथे चिमुकल्यांची आषाढी वारी उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राला संत परंपरा लाभलेली आहे. या संतांच्या पावन पवित्र भूमीतील वेगवेगळे सण उत्सव संस्कृती संक्रमणाचे कार्य मोठ्या प्रमाणात केले जाते
आमच्या डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा येथे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरा हे मुले रुजवण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या विठू माऊली चे पूजन करण्यासाठी शाळेत आषाढी एकादशी वारी काढण्यात आली. माऊलीच्या प्रतिमांचेपूजन प्राचार्या भारती महाजन व शिक्षकांनी केले. विठू नामाच्या गजरात अभंग, किर्तन, टाळ, मृदुंग यांच्या संगत संगीतमय आवाजाने शाळेचा परिसर दुमदुमला.
महाराष्ट्राला संत परंपरा लाभलेली आहे या संतांच्या पावन पवित्र भूमीतील वेगवेगळे सण उत्सव संस्कृती संक्रमणाचे कार्य मोठ्या प्रमाणात केले जाते .शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरा हे मुले रुजवण्यासाठी तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माऊली चे पूजन करण्यासाठी शाळेत आषाढी एकादशी वारी काढण्यात आली. माऊलीच्या प्रतिमां चे पूजन प्राचार्य भारती महाजन व शिक्षकांनी केले. विठू नामाच्या गजरात अभंग किर्तन टाळ मृदुंग यांच्या संगत संगीतमय आवाजाने शाळेचा परिसर दूम दूम ला. बाळ गोपाळांच्या समवेत आषाढी एकादशी वारीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात संपूर्ण शालेय घटकांचा समावेश होता. आणि हा कार्यक्रम अतिशय आनंदी उत्साही तावरणात पार पडला