जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रील २०२२ । डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय जळगाव येथे एलएल.बी.प्रथम वर्ष बी.ए. एलएल.बी. प्रथम वर्ष व एलएल.एम.प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी सिनिअर विद्यार्थ्यांतर्फे फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. केतकी पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात व जल्लोषात करण्यात आले. फ्रेशर्स पार्टीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यां मधून मिस्टर फ्रेशर म्हणून हुसेन खाटीक तर मिस फ्रेशरचा खिताब हा प्रियंका बानाईत कर यांनी पटकावला. तत्पूर्वी त्यांना वेगवेगळ्या राऊंड मधून वेगवेगळे टास्क पूर्ण करावे लागले.
फ्रेशर्स पार्टी सोबतच विद्यार्थ्यांसाठी गॅदरिंग 2k22 चे आयोजन करण्यात आले होते. ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सोलो डान्स, ग्रुप डान्स, ड्रामा, ग्रुप ड्रामा गायन व इतर स्पर्धांमध्ये भाग घेऊन कार्यक्रम जल्लोषात पार पाडला. सर्वोत्कृष्ट नृत्यांगना म्हणून एलएल. बी. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कीर्ती सावंत सर्वोत्कृष्ठ नाटककार म्हणून एलएल.बी.प्रथम वर्षाचा विद्यार्थी सम्राट सोनवणे यांची निवड झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य गाडगे सतीश यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीज प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे औचित्य साधून दि.१४ मार्च ते १९ मार्च २०२२ पर्यंत झालेल्या स्पोर्ट्स वीक मधील वेगवेगळ्या खेळातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यात बॅडमिंटन (मुले) सुयोग चोपडे (एल एल.बी.थर्ड इयर) हे विजेता ठरले तर मयूर सोनवणे (एल एल.बी.फर्स्ट इयर) हा उपविजेता ठरला. बॅडमिंटन मुली मधून अनघा अमले (एल एल. बी.थर्ड इयर) या विजेता तर इंगळे मनीषा (एल एल.एम. फर्स्ट इयर) या उपविजेत्या ठरल्या. बॉक्स क्रिकेट लीग मॅचेस मध्ये किशोर खलसे, गणेश जगताप, केतकी सावंत, मंगेश लोहार, जगदीश निमकर, इंगळे मनीषा व हुसेन खाटीक हे विद्यार्थी की मॅन ऑफ द मॅच ठरले. अटीतटीचा झालेल्या अंतिम सामन्यात एल.एल.एम.प्रथम वर्षाचा संघ हा विजेता तर बी.ए.एलएल. बी. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी संघ हा उपविजेता ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघांना व स्पर्धकांना प्रमुख पाहुण्या डॉ.केतकी पाटील यांच्या हस्ते ट्राफिज/ पारितोषिक वितरण करण्यात आले. मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य गाडगे एस. जी. यांच्या हस्ते ट्राफिज देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे ग्यादरिंग इन्चार्ज म्हणून मनीषा गाडगे तसेच कॉर्डिनेटर कमिटी मध्ये किरण वानखेडे, प्रियंका बानाईतकर, अजय कुमार जोशी, समीर वाले, सम्राट सोनवणे, चेतन गुजर, किशोर खलसे व मनीषा इंगळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.