⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

गारबर्डी धरण ओव्हर फ्लो : शेतकऱ्यांमध्ये आनंद

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । रावेर यावल या केळी पट्ट्यातून शेतकऱ्यांसाठी जीवन वाहिनी ठरलेल्या सुकी नदीवरील सातपुड्याच्या कुशीत असलेले गारबर्डी धरण आज दु ४ वाजेच्या सुमारास ओव्हर फ्लो झाले. यामुळे शेतकरी सुखावला असून शेतकरी बांधव आनंद व्यक्त करत आहे.


केळी पट्यातील पाल ,लोहारा , गौरखेडा ,कुभारखेडा , उटखेडा ,चिनावल , वडगाव ,निभोरा ,चिनावल ,विवरा ,वाघोबा ,दसनूर ,तर खिरोदा ,रोझोदा ,कळमोदा ,न्हावी , फैजपूर या शेती शिवारातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेली सुकी नदीवरील गारबर्डी धरण आज ओसडल्याने सुकी नदी यंदा प्रवाहीत होणार आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.

गारबर्डी धरण भरल्याने पर्यायाने सुकी नदी वाहती राहील व यांचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे शेत शिवारात पाणी झिरपून भूगर्भातील पाणी पातळी टिकून राहते. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे ,तर हे धरण भरल्याने गारबर्डी या सातपुड्याच्या निसर्ग रम्य परिसरात पर्यटकांची ही गर्दी वाढणार आहे.