जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । यावल शहरात तालुका होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेची बैठक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपन्न झाली. या बैठकीत जीवनगौरव पुरस्कार मिळालेल्या शहरातील डॉ. गणेश रावते व न्हावी येथील डॉ. प्रमोद पाटील यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच जळगाव जिल्हा संघटनेचे यावल तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून डॉ. प्रमोद पाटील व डॉ. सुनील पाटील यांचा एक मताने एकमताने ठराव करून निवडीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला.
या बैठकीत तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून डॉ. गणेश रावते यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे, उपाध्यक्ष डॉ. चंदन पाटील, सचिव डॉ. चंद्रकांत चौधरी, सहसचिव डॉ.नितीन महाजन, कार्यकारणी सदस्य डॉ. तुषार चौधरी, डॉ. खिलचंद पाटील, डॉ. साबीर खान समशेर खान, डॉ. नीलेश मोरे, डॉ.त्र्यंबक चौधरी, डॉ.चेतन चौधरी, डॉ. मनोहर महाजन यांची निवड झाली. या बैठकीत डॉ. प्रेमचंद फिरके, डॉ. सरफराज तडवी उपस्थित होते.