जळगाव शहरशैक्षणिक

गोदावरी अभियांत्रिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देत बहुजनांना उन्नती आणि समाजोद्धाराचा मार्ग दाखविणारे व सामाजिक न्याय व समतेचा पुरस्कार करत समाजातील उपेक्षितांसाठी संघर्ष करणारे प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात साजरी करण्यात आली.

jayanti २

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्याहस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अ‍ॅकेडमीक डीन प्रा.हेमंत इंगळे, रजिस्ट्रार ईश्‍वर जाधव, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डॉ.विजयकुमार वानखेडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख व अधिष्ठाजा उपस्थीत होते. यावेळी विद्यार्थी राजेश सुरदास याने मनोगतात बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील सर्व घटकांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button