⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सलग दुसऱ्या वर्षी सदस्यांविनाच जळगाव जि.प.चा अर्थसंकल्प सादर ; अशा आहेत तरतुदी‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२३ । जिल्हा परिषदेकडून सन‎ २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा‎ अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी‎ डॉ.पंकज आशिया यांनी बुधवारी ठराव‎ समितीकडे मांडला. यावर्षीचा‎ अर्थसंकल्पही प्रशासकाने सादर केला‎ असून, ३३ कोटी ८० लाख रुपयांच्या‎ संकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.‎ विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या‎ नसल्याने सलग दुसऱ्या वर्षीदेखील‎ सदस्यांविनाच अर्थसंकल्प सादर‎ करण्यात आला.

२०२२-२३ चा मूळ अर्थसंकल्प २९‎ कोटींचा होता.‎ ठराव समितीसमोर हा अर्थसंकल्प‎ सादर केल्यानंतर समितीने मंजुरी दिली.‎ मागील वर्षीही सीईओ डॉ. आशिया यांनी अर्थसंकल्‍प मंजूर करत २०२२-२३ साठी २२ कोटी ३३ लाखांचा अर्थसंकल्प केला होता. यात यंदा वाढ करत ३३ कोटी ८० लाखाच्‍या अर्थसंकल्‍पास मंजुरी दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील मुंद्राक शुल्क व जमिनी महसूल, अभिकरण शुल्क यासह विविध करातून वाढ होणार आहे.

अशा आहेत तरतुदी‎
यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद‎ ही ग्रामीण पुरवठा विभाग व पंचायत‎ राज विकास विभागासाठी प्रत्येकी ७‎ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली‎ आहे. तर बांधकाम विभागासाठी ५‎ कोटी ३० लाख, समाज कल्याण‎ विभागासाठी १ कोटी ६० लाख, महिला‎ व बालकल्याण विभागासाठी १ कोटी‎ ३७ लाख रुपये, कृषी विभागासाठी १‎ कोटी, गुणवत्ता विकास कार्यक्रमासाठी‎ ३३ लाख तरतूद करण्यात आली आहे.‎