जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । गेल्या चार पांच दिवसांपासून प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मनपाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याची संधी मिळाली आहे. आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश नगरविकास विभागाने बुधवारी सायंकाळी काढले असून ते महापालिकेला प्राप्त झाले. आयुक्त सतीश कुलकर्णी ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यानंतर राज्य शासनाने आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे सोपवली होती. गेले अनेक दिवस आयुक्त पदासाठी डॉ. गायकवाड आणि कल्याण मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, अखेर डाॅ. विद्या गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
[aioseo_breadcrumbs]