शेतकऱ्यांवर दुहेरी संकट : सीएमव्ही आणि लंम्पि मुळे शेतकरी हैराण

सप्टेंबर 18, 2022 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यातील रावेर तालुका हा संपूर्ण जगात केळी उत्पादनासाठी सुप्रसिद्धी आहे. मात्र आता या प्रसिद्धीला नजर लागली आहे. कारण गेल्या महिन्यांपासून लंम्पि आजारानं तालुक्यात थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला दिसत केळी पिकावर सीएमव्ही वायरस आलाय. त्यामुळे भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

bananana jpg webp

जळगाव जिल्ह्यात ४८ ते ५० हजार हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली जाते. रावेर तालुका हा केळी उत्पादनात जगात अग्रेसर मनाला जातो. या ठिकाणच्या केळीला एक विशिष्ठ प्रकारची चव आहे. त्यामुळे या केळीला जगभर मागणी असते. मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होत असल्याने या केळी पिकावर जळगावची अर्थव्यवसथा अवलंबून असल्याचं मानलं जातं.

याबाबत, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, जळगाव जिल्ह्यासाठी हा रोग नवा नाही. यावर योग्य त्या उपाययोजना केल्या तर हा रोग रोखला जाऊ शकतो. रोपांवर येणारा मावा आणि पांढरी माशी यावर त्वरित उपाययोजना केल्यात तर हा रोग पसरणार नाही. याचबरोबर जर शेतातील कोणत्याही झाडावर हा रोग दिसून आला तर त्वरित ते झाड नष्ट केले पाहिजे. जेणेकरून हा रोग पसरणार नाही. याचबरोबर मावा आणि पांढरी माशी यावर लिंबाच्या अर्काचा फवारा केला तर हा रोग पसरणार नाही.

केळीच्या शेतीसाठी बैलांचा वापर करावा लागत असल्याने मोठ्या संख्येने शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत. मात्र या भागात जनावरांवर लंम्पी आजार पसरल्याने शेतकरी चितीत आहे. त्यातच आता या भागातील मुख्य पीक असलेल्या केळी पिकावर सीएमव्ही म्हणजेच कुकुंबर मोझॅक व्हायरसने हल्ला केल्याने हजारो हेक्टर वरील केळी पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असल्याचं पाहायला मिळत आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now