जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । सत्ता येत – जात राहते. ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला आलेल नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र सैनिकांना राज्य शासन तडीपारीची नोटीस बजावत आहे. त्यांनी शांततेने आंदोलन करत असताना त्यांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. कित्येक महाराष्ट्र सैनिकांना अटक केली आहे. अशा वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
४ मे पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पूर्ण महाराष्ट्रात मशीन वरच्या भुंग्याने विरुद्ध आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला अजून कुठेही गालबोट लागलेला नाही. मात्र सरकार अजूनही सुप्रीम कोर्टाच्या नियमाची अंमलबजावणी करत नाहीये उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसी देत आहे यामुळे आता आमचा अंत पाहू नका असा इशाराच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्र या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुरुवात करण्यात आली आहे. मात्र राज्य शासनातर्फे कित्येक ठिकाणी अजूनही भोंगे उतरवले गेले नाही येत. उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत आहे. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अंत पाहू नका असा असल्याचे पत्र राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे