⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | अंतुर्ली विकासोत तराळ यांच्या पॅनलचे वर्चस्व

अंतुर्ली विकासोत तराळ यांच्या पॅनलचे वर्चस्व

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे विकासोत निवडणुकीत सहकार विकास पॅनल व शेतकरी विकास पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यात शेतकरी विकास पॅनलचा पराभव झाला, तर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, सुधीर तराळ, उपसरपंच गणेश तराळ यांच्या सहकार विकास पॅनलने सर्व १३ जागा जिंकल्या. रविवारी एकूण ८८१ पैकी ७९२ मतदान झाले. सायंकाळी पोलिस बंदोबस्तात मतमोजणी पार पडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ व सुधीर तराळ, अंतुर्लीचे उपसरपंच गणेश तराळ यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार विकास पॅनलने सर्व जागा जिंकल्या. सुधीर तराळ, पांडुरंग दुट्टे, योगिराज महाजन, अरविंद पाटील, दिनकर पाटील, सुधाकर पाटील, सुधाकर तोताराम पाटील, शेख शकील शेख युसुफ, कुसुम दवंगे, सविता महाजन, सुनील पाटील, सुनंदा गाढे, रवींद्र सोनवणे असे सर्व उमेदवार जिंकले. शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.ए.भोई, शरद महाजन, मोहन सुधाकर महाजन, दिनेश सोपान पाटील, गणपत महाजन, भाऊराव महाजन यांनी केले. मात्र, त्यांचा एकही संचालक निवडून आला नाही. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीने जल्लोष केला. विनोद तराळ यांनी विजेत्या उमेदवारांचा सत्कार केला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह