जळगावात कुत्र्याने तोडले दीड वर्षाच्या बालकांचे लचके

मे 6, 2021 1:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । जळगाव शहरामधील उस्मानिया पार्क येथे अंगणात खेळत असलेल्या दीड वर्षाच्या बालकावर पिसळलेला कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरूवारी सकाळी १० वाजता घडली. सुदैवाने परिसरातील नागरीकांनी धाव घेवून बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले आणि तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.

jalgaon

याबाबत असे की, शहरातील उस्मानिया पार्क येथे शाहरूख खान हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्यास असून आज सकाळी त्यांचा दीड वर्षाचा मुलगा इरफान शाहरूख खान अंगणात खेळत असताना त्याच्यावर अचानकपणे एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला.

कुत्र्याने बालकाच्या मानेवर मोठ्याने चावा घेतला. यात बालक गंभीर जखमी झाला. बालकावर कुत्र्याने हल्ला केल्याचे पाहून आई नाजमीबी यांनी आरडाओरड केली. त्यावेळी परिसरातील नागरीकांनी धाव घेवून बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. तातडीने खासगी वाहनाने जखमी बालकाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारर्थ दाखल करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now