जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 मे रोजी ऑनलाईन होणार

एप्रिल 28, 2021 2:51 PM

 जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 मे, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे. यादिवशी लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा बैठक देखील होणार आहेत. जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील विभागांचा प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन व त्याबाबतचा निपटारा करुन यादिवशी आवश्यक त्या अहवालासह सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now