⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जिल्हा बँक मसाका घेणार ताब्यात?, कारखाना भाडेतत्वावर देणार

नाशिक लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । जिल्हा बॅकेचे ५५ काेटी रूपयांचे कर्ज थकल्याने बॅकेने सेक्युटरायझेशन कायद्यातंर्गत कारखाना ताब्यात घेण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाला नाेटीस दिली आहे. संचालक मंडळाने कारखाना भाडेतत्वावर देऊन डिपाॅझिटपाेटी घेतलेली एकरकमी रक्कम बॅकेला देण्याचा प्रस्ताव ठेवला हाेता. त्याला अपेक्षीत प्रतिसाद मिळालेला नाही. बॅँकेने स्वत: कारखाना ताब्यात घेऊन ताे भाडेतत्वावर चालविण्यासाठी देण्याचा पर्याय ठेवला आहे.

जिल्हा बँकेच्या कर्जामुळे अडचणीत आलेल्या फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याची तयारी जिल्हा बॅंकेकडून करण्यात आली आहे. कारखान्याला नाेटीस बजावल्यानंतर या प्रक्रियेला गती आली आहे. त्यानुसार आधी कारखान्याचा ताबा घेण्याची कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. कारखान्याला नाेटीस दिल्याने ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. मसाकाकडे शेतकरी आणि कामगारांची रक्कम थकीत आहे. कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यानंतर ही देणी चुकती करता येतील.

जिल्हा बॅंकेकडून शेतकऱ्यांकडे थकीत असलेले पीक कर्ज वसूल करण्यासाठी विशेष माेहीम हाती घेण्यात आलेली आहे. बँकेचे शेतकऱ्यांकडे १ हजार काेटी रूपयांचे कर्ज थकले आहे. गेल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांनी भरलेल्या थकबाकीचा आकडा अजून १०० काेटींवर गेलेला नाही. त्यामुळे बँकेने कर्ज वसुलीची माेहीम वाढवली असून मार्च महिन्यात वसुलीचे शिबिरे आयोजित केली जाणार आहे.