जिल्हा बँक निवडणूक : खडसे-पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रविवारी कार्यक्रम पार पडला. दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीतील उमदेवारीवरुन माजी मंत्री एकनाथ खडसे व माजी आमदार अरुण पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. यामुळे व्यासपीठावरील उपस्थितही आवक झाले.
खडसे म्हणाले की, आपण पॅनलच्या लोकांना निवडून आणले… तुम्ही गिरीश महाजन यांना जाऊन भेटले म्हणून पॅनलच्या बाहेर गेले. यावर अरुण पाटील यांनी राष्ट्रवादीचे निष्ठावंत असूनही आम्हाला पॅनलमध्ये जागा मिळाली नसल्याचे सांगितले. वर खडसे म्हणाले की, तुम्ही, गिरीश महाजन यांना जाऊन भेटल्याने तुम्हाला पैनल मध्ये जागा मिळाली नाही..”मला माफी असावी मी पॅनलचा माणूस पाडून तुम्हाला निवडून आणू शकलो नाही. कारण आपण पक्षाचे काम करणारे आहोत. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष उभा राहतो, ती केवळ शोभेची ठरायला नको, असेही ते म्हणाले.
फडणवीसांवर टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस मिळाली तर एवढा जळफळाट होत आहे. त्यांनी माझ्या मागे ईडी लावली, माझे फोन हॅक केले, मला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. अशी टीका खडसे यांनी फडणवीस यांच्यावर केली.