⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | गुन्हे | भुसावळ तालुका हादरला! प्रेम संबंधातून होणाऱ्या भांडणातून तरुणाने विवाहितेचा केला खून

भुसावळ तालुका हादरला! प्रेम संबंधातून होणाऱ्या भांडणातून तरुणाने विवाहितेचा केला खून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२४ । भुसावळ तालुक्यातील साकेगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे प्रेम संबंधातून होणाऱ्या भांडणातून तरुणाने २८ वर्षीय विवाहितेवर चाकूचे वार करून तिचा खून केल्याची घटना घडली. सोनाली महेंद्र कोळी (वय २८ रा. साकेगाव ता. भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव असून याबाबत संशयित आरोपी सागर रमेश कोळी (वय २८) याला अटक करण्यात आली. तर या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला आहे.

नेमकी घटना काय?
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे सोनाली कोळी ही पती व लहान मुलांसह वास्तव्यास असून गावातील एका सागर कोळी या तरुणसोबत तिचे प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधमधून त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असे. दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री सागर कोळी याने सोनाली महिंद्र कोळी हिच्याशी पुन्हा भांडण उकरून काढले. भांडणामधून सागर कोळी याने सोनाली कोळी हिच्या पाठीवर, पोटाच्या बाजूला, उजव्या हाताला, चाकूने भोसकून जबर दुखापत केली.

यात गंभीर झालेल्या सोनालीला भुसावळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याबाबत विनोद कुभांर यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सागर कोळी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयीत आरोपी सागर कोळी यास ताब्यात घेतले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहेत. या घटनेमुळे साकेगावात एकच खळबळ उडाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.