⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | २५ वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

२५ वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । कुसुंबा येथील २५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. धनंजय चंद्रजित बाविस्कर (वय २५) रा. धनवाडी ता. चोपडा ह.मु. कुसुंबा ता.जि.जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, धनंजय बाविस्कर हा गेल्या दोन वर्षांपासून पत्नी उज्ज्वलासह वास्तव्याला होता. त्याच गावात धनंजयची बहिण शुभांगी आणि मेहुणे दिपक पाटील राहतात. एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीला होता. दरम्यान अक्षयतृतीयेच्या निमित्ताने पत्नी उज्ज्वला माहेरी गेली असल्याने धनंजय हा घरी एकटाच होता. शनिवारी २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता बहिण शुभांगीकडे जेवण केले आणि तो त्याच्या घरी निघून आला. मध्यरात्री धनंजयने रूमालाने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ११ वाजले तरी धनंजय उठला नाही अशी शंका शेजारी राहणाऱ्यांना आली. शुभांगी ह्या घरी आल्यावर भावाने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महेंद्र गायकवाड, नरसिंग पाडवी हे करीत आहे. शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी उज्वला, आई, वडील व बहिण असा परिवार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह