जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । एरंडोल नगरपालिकेतर्फे सर्व सफाई कामगारांना नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप शुक्रवार दि.१५ रोजी करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याधिकारी विकास नवाळे, स्वच्छ महाराष्ट्रचे राज्य समन्वयक ओमकार शौचे, उपनगराध्यक्ष आरती महाजन, नगरसेवीका जयश्री पाटील, नगरसेवक सुरेश पाटील, योगेश देवरे, कार्यालय अधीक्षक हितेश जोगी, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, आनंद दाभाडे यांसह सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.