---Advertisement---
महाराष्ट्र

ओम गगनगिरी वर्ड फाउंडेशनतर्फे डोंगराळ भागातील गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२४ । OGW फाऊंडेशन ही संस्था दुर्गम भागामध्ये जाऊन ज्या ठिकाणी खरोखर ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण त्याच्या परिस्थिती नुरूप शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांन पर्यत पोहोचते, त्या ठिकाण ची माहिती काढून त्या गावातील शाळेमध्ये किंवा शिक्षण घेत असताना त्या मुलांना ज्या अडचणी येतात त्यावर कशी मात करायची,त्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल याचा विचार ही संस्था आपले कार्य करीत असताना करते,नोटबुक्स ,पेन,पेंशील, खोडरबर, लिहिण्याचे पॅड, रेनकोट अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप आताच अंदर मावळात, माळेगाव ब्रू, तडपेवाडी या दोन गावांमध्ये केले.

Om Gagangiri Word Foundation

माळेगाव ब्रू (मावळ) या शाळेतील शिक्षक श्री मनीष टोके सर म्हणाले ओम गगनगिरी फाउंडेशन तर्फे आपण सर्व प्रतिनिधी आमच्या शाळेत आलेत आपण फक्त विद्यार्थी हिताचा विचार करून एवढया आत मधील दुर्गम भागातील शाळेत आमच्या मुलांना रेनकोट व आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप केले ,खऱ्या अर्थाने मुलांची परिस्थिती पाहून आपण हा निर्णय घेतलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

---Advertisement---

असेच विद्यार्थी प्रति सहकार्य व प्रेम राहील ही आशा,तडपेवाडी (मावळ) या शाळेतील शिक्षक श्री कृष्णा झाम्बरे सर म्हणाले आपली टीम अंदर मावळातील दुर्गम भागात असणाऱ्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी आली आणि मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलत त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे ,पावसाळ्यात आवश्यक असणारा रेनकोट व अभ्यासासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य पुरवून आपण मुलांच्या शिक्षणासाठी एक प्रकारे प्रेरणाच दिली ही अनमोल भेट मुले कधीच विसरणार नाहीत.

संस्थापक, अध्यक्षा डॉ रेखा भोळे म्हणाल्या हे कार्य करण्यासाठी आमच्या फाउंडेशन ला माननीय मोरेश्वरभाऊ भोंडवे ,नामदेव ढाके, मनोज पाटील,राकेश वायकोळे, प्रवीण नारखेडे यांनी मदत केली, किरण चौधरी, कु ओम भोळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे यांनी अनमोल असे सहकार्य केले,

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---