एरंडोल

एरंडोलच्या युवकाची नाशिकमध्ये आत्महत्या!

erandol news-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथील साने गुरुजी कॉलनीतील रहिवाशी तथा नाशिक येथे कंपनीत नोकरी असलेला श्रीकांत उर्फ भैय्या चंद्रकांत ठाकूर वय २८ वर्षे या युवकाने नाशिक येथे सह्याद्री लॉज मध्ये दोरीचा गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना १३ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत नाशिक पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

jalgoan 6 jpg webp

येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत ठाकूर यांचा तो एकुलता एक मुलगा होता. विशेष हे की, गेल्या चार महिन्यापूर्वी श्रीकांत चा विवाह झाला होता. एरंडोल येथे संध्याकाळी श्रीकांत याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या आकस्मित निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या आत्महत्या मागचे कारण समजू शकले नाही. मात्र, सेवानिवृत्त झालेल्या चंद्रकांत ठाकूर यांचा तो वृद्धपाकाळातील एकमेव असलेला आधार काळाच्या पडद्याआड गेला.

Related Articles

Back to top button