पद्मालय तलावातून काढला अडीशे ट्रॉली गाळ

जुलै 28, 2022 2:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । एरंडोल तालुक्यातील जागरूक देवस्थान पद्मालय येथील तलावातून जेसीबीच्या साह्याने तब्बल अडीशे ट्रॉली गाळ काढण्यात आला याशिवाय तलावा लगत वाढलेली काटेरी झुडपे तोडण्यात आली अशाप्रकारे तलावाच्या परिसर स्वच्छ करण्यात आला.

jesipi

श्री क्षेत्र पद्मालय येथे तलावात गाळ साचल्यामुळे पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत होता तसेच काटेरी झुडपे वाढल्याने भाविकांना तलावात स्नान करणे अवघड झाले होते ही समस्या ओळखून एरंडोल येथील डी. डी. एस. पी. संस्थेचे चेरमन अमित पाटील व पारोळा येथील नॉकमी ॲपचे संस्थापक अभियंता स्वप्नील पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ही मोहीम राबवली त्यांच्या या कामगिरीमुळे पद्मालय देवस्थानचे विश्वस्त मंडळ व भाविकांनी त्यांना धन्यवाद दिले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now