⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

पिंक ऑटो रिक्षांचे आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते वितरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ ।  मराठी प्रतिष्ठान मार्फत पाच पिंक ऑटो रिक्षाचे वितरण आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी प्रतिष्ठान मार्फत पिंक ऑटो रिक्षा घेणाऱ्या शंभर महिलांना स्वतंत्ररित्या दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचे याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, मोटर वाहन निरीक्षक हेमंत सोनवणे, उद्योजक सुबोध कुमार चौधरी, पंजाब नॅशनल बँकेचे शाखाधिकारी सुयोग देसले, टॅक्सी युनियनचे रज्जाक गणी खान, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे उपस्थित होते.

शहरातील महिला रिक्षा चालवण्याचा व्यवसाय अतिशय उत्तम रीत्या करत असून शहराच्या नावलौकिकास भर पडत आहे त्याकरता त्यांचे कौतुक केले तेवढे थोडे आहे असे उदगार आमदार सुरेश भोळे यांनी या प्रसंगी केले. महिलांकरता स्वतंत्र रिक्षा थांबा देण्याबाबत महानगरपालिका परिवहन अधिकारी या सर्वांसोबत चर्चा करून लवकरच मार्ग काढू असेही आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. समाजाप्रती काही देणं लागतो याची जबाबदारी घेऊन यापुढे मराठी प्रतिष्ठान मार्फत पिंक ऑटो रिक्षा घेणाऱ्या शंभर महिलांना स्वतंत्ररित्या दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचे याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सदैव पिंक आटो रिक्षा चालवणाऱ्या महिलांच्या पाठीशी असून रिक्षा चालविताना ज्या काही समस्या आल्यास त्यांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी याप्रसंगी केले. तसेच शहरातील कोणत्याही रिक्षा थांब्यावर पिंक आटो रिक्षा उभ्या करता येतील याबाबत सविस्तर माहिती दिली.

टॅक्सी युनियनचे रज्जाक गणी खान व रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे यांनी पण आपले विचार व्यक्त केले. पिंक ऑटो महिलांचे लायसन्सचे काम करणारे किरण अडकमोल व महिलांना ट्रेनिंग देणारे नूर शेख यांचा याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महिला पिंक आटो चालक संगीता बारी व पूनम गजरे यांनी आपले अनुभव कथन केले.

यांना दिल्या आज रिक्षा
पुनम वानखेडे, विजेता सोनवणे, सुनीता सपकाळे, जयश्री पाटील, धनमाला सुरडकर,याप्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे,विश्वस्त निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार, तांबापुर फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल पिंप्राळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.