⁠ 
शनिवार, मे 18, 2024

आमदार, महापौरांच्या हस्ते खावटी अनुदान योजनेंतर्गत खावटी कीट वितरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ ऑगस्ट २०२१ । महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आज बुधवार, दि. 4 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास खावटी कीटचे वितरण करण्यात आले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील खेडी कढोली रोडवरील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात हा कार्यक्रम पार पडला. जळगाव शहराचे आमदार मा.श्री.सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन प्रमुख अतिथी होते, तर नगरसेविका सौ.पार्वताबाई भिल, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती श्री.प्रभाकर सोनवणे व श्री.चौधरी हेही यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी, पारधी, आदिम व अनुसूचित जमातींसाठी राबिली जाणारी ही राज्य पुरस्कृत ही कर्ज व अनुदानित योजना आहे. ही योजना मध्यंतरी बंद करण्यात आली होती. मात्र, ‘कोविड-19’च्या प्रादुर्भावामुळे सन 2020 मध्ये खावटी कर्ज योजनेचे रूपांतरण 100 टक्के अनुदानित करण्यात आले. ज्यामध्ये पात्र लाभार्थ्यास 2000/- रुपये रोख व 2000/- रुपये किमतीचे अन्नधान्य वितरीत केले जाते. या योजनेंतर्गत आज लाभार्थ्यांना अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तंच्या कीटचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.