कासोदा येथे चालक-मालक संघटनेतर्फे शिवरात्री निमित्त फराळाचे वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२२ । सालाबादाप्रमाणे यावर्षीही कासोद्यात जयभोले चालक – मालक संघटनेच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने साबुदाणे खिचडी व चहा’चे वाटप करण्यात आले.
कासोद्यातील एरंडोल – भडगाव रस्त्यावरील श्री महेश मंदिर येथे मंगळवार रोजी महाशिवरात्रीच्या या शुभपर्वावर चालक मालक संघटनेतर्फे यावर्षी ही ३ क्विंटल साबुदाणे दिड क्विंटल बटाटे, एक क्विंटल शेंगदाणे कूट ने बनवली सर्वात्कृष्ठ साबुदाणे खिचडी व चहा’चे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमधील, महिला- पुरुष सर्वांना चालक मालक ग्रुप’ने गाडी थांबवून प्रसादाचे वाटप केले .
याप्रसंगी दरवर्षीप्रमाणे जय भोले चालक मालक संघटना जय भोले ग्रुपचे सर्व ४०७ गाडी, पिकअप, ओम्नी व मालवाहू गाडीचे चालक – मालक तथा महेश मंदिर परिसरातीलच छोटे- मोठे व्यापारी दुकानदार तथा गावांतील काही ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात सर्वजण हिरिरीने सहभागी होतात. जय भोले ग्रुपतर्फे दरवर्षी होत असलेल्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.