⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

राज्यकीय खळबळ : खान्देशातला ‘हा’ विरोधी पक्षातला आमदार करणार खडसेंना मतदान

जळगाव लाईव्ह न्युज । १९ जून २०२२ । एकनाथराव खडसे यांना एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारूक शहा हे मतदान करणार आहेत. यामुळे आता खडसे यांच्या आमदारकीचा एक अडथळा दूर झाला आहे. दुपारी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की एकनाथराव खडसे हे खानदेशचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे श्रेष्ठत्वाचा मान ठेवत मी त्यांना मतदान करणार आहे. याचबरोबर हे माझं वैयक्तिक मत असून पक्षाची भूमिका बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी ठरवतील असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे. विरोधी पक्षाकडून होणारे आरोप-प्रत्यारोप यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे जर विधान परिषदेच्या सभागृहात आले तर राष्ट्रवादीची बाजू अधिक भक्कम होणार आहे. यामुळे उत्तर भारतात पक्षाला देखील अधिक बळ मिळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत खडसेंना विधानपरिषदेवर निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते कामाला लागले आहेत. ज्यात खुद्द अजित पावर यांचा समावेश आहे.

याआधी खडसेंनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. भारतीय जनता पक्षामध्ये माझ्या संपर्कात असलेले कित्येक आमदार आहेत. या आमदारांना आमदार बनवण्यासाठी त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले होते. यामुळे त्यांचा आणि माझा संपर्क नेहमी येत असतो. कित्येक आमदारांना माझ्यामुळे मंत्रिपद मिळाले असल्यामुळे ते आमदार माझ्याशी संपर्कात असतात. मात्र ते पक्षविरोधी भूमिका घेतील असं मला वाटत नाही. याच बरोबर भारतीय जनता पक्ष हा केवळ एकनाथराव खडसे यांच्या विरोधात प्रचार करत नसून तो महाविकासआघाडी विरुद्ध प्रचार करतोय मात्र याच्या मध्ये विजय महाविकास आघाडीचा होईल असेही त्यावेळी खडसे म्हणाले.