जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । भुसावळ तालुक्यातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे व गणेश उत्सवमित्र मंडळातर्फे गणेश उत्सवाचे औचित्य निमित्त साधून ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम अंतर्गत गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून वंचित, गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गेल्या पाच वर्षांत पासून तब्बल २१ शाळांमध्ये किमान १७८० गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.

भुसावळ, बोदवड, यावल आणि रावेर तालुक्यातील शाळा निवडून हे साहित्य वाटप करण्यात आले. यंदाही ग्रामीण व शहरी भागातील पाच शाळांची निवड करून त्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात पाटी, पेन्सील, वह्या, पेन, कंपासपेटी, गणवेश, पुस्तक या साहित्याचा समावेश असेल. अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. ज्या दात्यांना शक्य असेल त्यांनी उपक्रमात सहभागी होऊन शालेय साहित्य मदत म्हणून संस्थेस देण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख समाधान जाधव, प्रकल्प समन्वयक ज्ञानेश्वर घुले आणि सह समन्वयक देव सरकटे यांनी केले आहे.

उपक्रमासाठी योगेश इंगळे, जीवन महाजन, संजय भटकर, प्रदीप सोनवणे, प्रसन्ना बोरोले, अमितकुमार पाटील, राजू वारके, अमित चौधरी, भूषण झोपे, निवृत्ती पाटील, प्रा.श्याम दुसाने, राजेंद्र जावळे, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, विजय देवरे, राहुल भारंबे, तेजेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, हरीश भट, जीवन सपकाळे, सचिन पाटील, प्रमोद पाटील, मंगेश भावे, अध्यक्ष संदीप पाटील परीश्रम घेत आहेत.







