⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

खंडीत वीज पुरवठ्यामुळे आरोग्य सेवेला फटका

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । विजेची मागणी वाढल्याने महावितरणतर्फे वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे प्रदूषण शस्त्रक्रियेचे नियोजन करणे कठीण झाले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असताना वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा थेट परिणाम हा आरोग्य सेवेवर होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

खंडित वीज पुरवठा विषयी डॉक्टर मंडळींनी महावितरणकडे विचारणा केली असता भारनियमन सुरू झाल्याचे सांगण्यात आले मात्र याविषयी वेळापत्रक जाहीर न केल्याने नियोजन कोलमडते असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केल्यास कोणत्याही शस्त्रक्रिया करताना वेळापत्रकानुसार नियोजन करणे सोयीचे होईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोना संसर्ग कमी झाल्याने अनेक नियोजन शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मात्र त्यात भारनियमनत्यावर अडथळा ठरत आहे. उकाडा वाढल्याने विजेची मागणी वाढण्याणे सहाजिकच आहे. मात्र भारनियमन करत असताना त्याचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे.