जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । बाहुटे ( ता.पारोळा ) येथील रहिवासी धनराज धोंडू इनाईत यांची एरंडोल उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्यपदी निवड झाली आहे. यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी त्यांची शिफारस केली होती.

तत्पुर्वी पंचायत समिती सदस्य प्रमोद जाधव (रा.मंगरुळ) यांनी दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने, इनाईत यांची निवड झाली. निवडीचे राजू जावरे, गौतम पवार यांनी स्वागत केले आहे. यामाध्यमातन गरजूंना न्याय देऊ असे इनाईत म्हणाले.

हे देखील वाचा :







