⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | धनगर समाज व मेंढपाळांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार : खासदार रक्षा खडसे

धनगर समाज व मेंढपाळांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार : खासदार रक्षा खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Muktainagar news -जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात खासदार व आमदार यांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाचे भव्य मेळाव्याचे आयोजन काल १६ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले. मेळाव्यात खासदा रक्षाताई खडसे यांनी धनगर समाज व मेंढपाळांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

धनगर समाज व मेंढपाळांच्या अनेक समस्या लोकप्रतिनिधीद्वारे सरकारकडे मांडून सोडवण्यासाठी मुक्ताईनगर येथे जय मल्हार मेंढपाळ सेना व समस्त धनगर समाज मुक्ताईनगर तालुकाच्या वतीने ‘भव्य धनगर समाज निर्धार मेळावा’ चे खासदार रक्षाताई खडसे, आमदार चंद्रकांत पाटील व जय मल्हार सेना सरसेनापती लहूजी शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थित आयोजन करण्यात आले होते. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ऊन, वारा व पाऊस अशा कठीण परिस्थितीत धनगर समाज मेंढी पालन केलेल्या मेंढ्या चारून आपला उदरनिर्वाह करत असून, मेंढ्यांना वनक्षेत्रात चराई केल्यामुळे वन विभागामार्फत मेंढपाळांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दखल करण्यात येतात यासारख्या समस्या उपस्थित करण्यात आल्या असता, मेंढपाळांवरील गुन्हे रद्द करणे तसेच धनगर समाज व मेंढपाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार याबाबत लोकसभा व राज्य सरकार कडे पाठपुरावा असे खासदार रक्षाताई खडसे यांनी सर्व उपस्थित धनगर समाज बांधवांना आश्वासन दिले.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह, आमदार चंद्रकांत पाटील, जय मल्हार सेना सरसेनापती लहूजी शेवाळे, रंजना बोरसे, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, भाजपा तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, भाजपा शहराध्यक्ष पंकज कोळी, नामदेव बाजोड, मंगला हिववाले, कारभारी दांडगे, मनोज मोरे, सुधाकर जुमले, कैलास वाघ, राम घुले, सूर्यभान कवळे, भावराव तांबे, साहेबराव करडे, हिरामण येळे, रविंद्र पाचपोळ, बाळू शिंदे, पुंडलिक सरक, शंकर केसकर, संदिप जुमळे, सिताराम बिचकुले, भारत मदने. सोना खताळ, तानु नानकर, मका कांदडे, देमा नानवर, भिका माने, भावडा कोळपे, दिगंबर कांदडे, तुळशिराम गोयकर, पंढरी पडळकर, बिचकुले यांच्यासह असंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह