⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी करून दिली खडसेंची ओळख, मग..

जळगाव लाईव्ह न्यूज | १७ जून २०२२ | एकनाथराव खडसे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमधील वैर संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या सात वर्षांपासून पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथराव खडसे नेहमीच पाहायला मिळतात. या दोघी नेत्यांनी एकत्र काम देखील केले आहे. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथराव खडसे यांची ओळख विधानपरिषद सभागृहाला करून दिली.यावेळी विधासभेत खिळीमिळीचे वातावरण पाहायला मिळाले. (fadanvis and khadse friendship)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषद नेते पदी निवड करण्यात आली आहे. अशावेळी एकनाथराव खडसे हे नवनियुक्त विधान परिषद आमदार असल्यामुळे त्यांची ओळख देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली. ही ओळख करून देत असताना संपूर्ण विधानसभेच्या सभागृहामध्ये एकच हशा पिकला. एकनाथराव खडसे यांनी आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली असताना देवेंद्र फडणवीस यांनी हसतमुख होत विधान परिषदेमध्ये एकनाथराव खडसे यांची ओळख करून दिली.

यावेळी मंत्री. गिरीश महाजन यांनी मोठमोठ्याने बाक वाजवत एकनाथराव खडसे यांचे विधानपरिषदेमध्ये स्वागत केले. अशावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यावेळेस गिरीश महाजन यांची ओळख मंत्री म्हणून करण्यात आली होती. त्यावेळी एकनाथराव खडसे देखील हसतमुख होते. खडसे यांनी गिरीश महाजन यांचे मंत्री म्हणून अभिनंदन केले होते.आणि बाक वाजवले होते.