⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शिवसेनेचे कार्य घरा-घरात पोहचवा : संजय सावंत

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । एरंडोल तालुक्यातील खर्ची व तळई येथे शिवसंपर्क अभियान मेळावाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत पदाधिकारी व शिवसैनिक हे होते. यावेळी सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेसाठी केलेली सर्व कामे लोकांपर्यंत पोहोचवावीत असे मत व्यक्त केले.

तसेच या मेळाव्याचे अध्यक्ष शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती संवेदनशील आहेत व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत, शिवसेनेत आलो फक्त शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, भारतीय जनता पार्टी घाणरडे राजकारण करत असून मुख्यमंत्री ठाकरे यांना बदनाम करण्याचे काम करत असल्याचे म्हणाले, आ. चिमणराव पाटील यांनी मतदार संघात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असल्यामुळे विकास कामात आपण आघाडीवर असल्याचे मत व्यक्त केले.

या मेळाव्याला जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, युवा सेना तालुका प्रमुख बबलू पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पाटील, रवींद्र चौधरी, शिवसेना शहर प्रमुख कुणाल महाजन, पंचायत समितीचे माजी सभापती रोकडे, मोहन सोनवणे, दादाजी पाटील, दत्तू पाटील, ओकार पाटील, विभाग प्रमुख रवी जाधव, देशमुख राठोड, विभाग प्रमुख छोटू मराठे, कासोदा शहर प्रमुख महेश पांडे, युवा सेना तालुका समन्वयक कमलेश पाटील, यांच्यासह बहुतांशी गावांचे सरपंच, विकास सोसायटींचे चेअरमन, शिवसेनेचे शाखाप्रमुख व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.