⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

नारायण राणेंकडून ठाकरेंची बदनामी – दीपक केसरकर

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बदनामी केली गेली. यात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचाही सहभाग होता.असा आरोप केसरकर यांनी केला.

यावेळी ते म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगितले. त्यांनीही (मोदी) प्रतिसाद दिला. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात संवाद सुरु झाला. नंतर त्यांची भेट झाली. मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते.

मोदी आणि ठाकरे यांच्याच संवात सुरु होता. त्याचवेळी नंतर 12 आमदारांचे निलंबन झाले. नंतर नारायण राणे यांना केंद्रात घेतले गेले. यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले. ही गोष्ट दोनतीन लोकांना माहिती होती. त्यात रश्मी ठाकरे याही होत्या. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा, आपण एकत्र येवू, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याला सांगितले.पण भाजप तयार झाली नाही, असा दावा दीपक केसरकर यांनी केला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बहुसंख्य आमदार त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.