दाऊद, छोटा शकील गँगकडून नाथाभाऊंना जीवे मारण्याची धमकी ; राजकीय वर्तुळात खळबळ

एप्रिल 17, 2024 10:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आले आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली असून ही धमकी कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान,याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी आली होती. १५ आणि १६ एप्रिल रोजी हे फोन आले होते.

khadse jpg webp

काय दिली धमकी
छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत. चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, सदर नंबर ट्रेस केल्यानंतर एक अमेरिका आणि एक उत्तर प्रदेशातील असल्याचं दिसत आहे. याबाबत पोलीस स्टेशला मी तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता या प्रकरणी चौकशी करतायत. तपासात काय समोर येतं ते पाहावं लागेल, असंही एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितलं.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now