प्रथमोपचारा अभावी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू; कारवाईची मागणी

एप्रिल 9, 2022 8:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । सर्पदंश झालेल्या महिलेला नगरदेवळा ता.पाचोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, येथे कोणत्याही प्रकारचे प्राथमिक उपचार न करता थेट १०८ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेने रुग्णाला पुढील उपचारासाठी रवाना केले. मात्र, या विलंबामुळे ‘त्या’ निरपराध महिलेला मृत्यू झाला. अधिकारी व कर्मचारी दोषी असल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला असून त्यांचेवर योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे.

death 35 jpg webp

अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील छोटीबाई सुरेश चित्ते यांना दि. ५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास सर्पदंश झाला होता. त्यांना तात्काळ गावातील लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते तसेच उपस्थित आरोग्य सेविकेने कोणत्याही प्रकारचे प्रथमोपचार न करता थेट भडगाव रुग्णालयात दाखल करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. रुग्णाला भडगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तेथील डॉक्टरांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असता त्यांचा मृत्यू झाला. या विलंबामुळे एका निरपराध महिलेला आपला जीव गमवावा लागला असून या प्रकारास सर्वस्वी नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी व कर्मचारी कर्मचारी दोषी असल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला असून त्यांचेवर योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now