भाजपच्या नेत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; जळगाव जिल्ह्यात खळबळ

ऑगस्ट 27, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत असून अशातच एक खळबळ उडवणारी घटना समोर आलीय. ज्यात भाजपच्या माजी नगरसेवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना चाळीसगावामध्ये घडलीय. प्रभाकर चौधरी असं हल्ला झालेल्या नेत्याचं नाव असून या हल्ल्यामध्ये प्रभाकर चौधरी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी धुळ्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तैणात करण्यात आली आहेत.

Untitled design 38 jpg webp

प्रभाकर चौधरी हे चाळीसगावमधील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महजान यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगावमधील वैष्णवी साडी सेंटरजवळ मंगळवारी रात्री चौधरी यांना एकटं गाठून डाव साधला. अज्ञात हल्लेखोरांनी चौधरी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून चौधरी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर चाळीसगावमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळ्याच्या खासगी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा हल्ला राजकीय हेतूने होता की दुसरे काही कारण होतं, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून याबाबतचा तपास करण्यात येत आहे.

चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी आपली पथके रवाना केलीत. चौधरी यांच्यावरील हल्ल्याचा चाळीसगावमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now