⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | काळ्या जादूचा प्रकार की, जाणून बुजून सापांना ठार केलं : प्लास्टिकच्या बरणीत आढळले मृत साप

काळ्या जादूचा प्रकार की, जाणून बुजून सापांना ठार केलं : प्लास्टिकच्या बरणीत आढळले मृत साप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । चाळीसगाव येथे मृत साप आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा काळ्या जादूचा प्रकार आहे की, जाणून बुजून सापांना ठार करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले जाते, याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. शहरातील हिरापूर रस्त्यालगत असलेल्या एका लॉन्सजवळ प्लास्टीकच्या बरणीत मृत साप आढळल्याने संताप व्यक्त होत आहे.

अधिक माहिती अशी की, हीरापूर राेडवरील लॉन्स जवळील रेल्वे बोगद्या जवळ मृत व कुजलेल्या अवस्थेतील सर्प आढळून आले. या बोगद्याच्या दोन्ही बाजूने कुजलेल्या अवस्थेतील लहान मोठे सर्प प्लास्टिकच्या बरण्या व बारदानात आढळून आले आहेत. त्यामुळे प्राणीमित्रांनी संताप व्यक्त केला आहे. काही तरुण सापांसोबत आपले फोटो, व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकतात. तर काहीजण सापांसोबत स्टंट करत असतात. चाळीसगाव येथे प्लास्टीकच्या बरण्या व बारदानामध्ये आढळून आलेले मृत सर्प हा स्टंटबाजीचा प्रकार आहे, की काळी जादूचा याची सखोल चौकशी करावी. तसेच संबंधीतांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे. प्रशासनाने तसेच वनविभागाने या प्रकरणी दोषी असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे. तसेच परिसरात या मृत सापांमुळे दुर्घधी येत आहे. वनविभागाने या प्रकाराची चौकशी करावी.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह