विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

ऑक्टोबर 14, 2025 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील दोन्ही परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षाही याच कालावधीत होणार आहे. प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्युएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाईल. प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. शरीरशास्त्र, आरोग्य शास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही याच कालावधीत घेतल्या जाणार आहेत. विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now