जळगाव जिल्हाजळगाव शहर

लिनेस क्लब अध्यक्षपदी दर्शना ललवाणी तर सचिव शैला छोरीया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । लिनेस क्लब जळगावचा पदग्रहण साेहळा नुकताच पार पडला. मावळत्या अध्यक्षा प्रीती जैन यांनी नूतन अध्यक्षा दर्शना ललवाणी यांच्याकडे तर मावळत्या सचिव अलका कांकरिया यांनी नूतन सचिव शैला छोरीया यांना पिन देत क्लबची सूत्रे सोपविली आहेत. कोषाध्यक्षपदी कोमल राका यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून एम. एच. ५ हिरकणीच्या प्रातांध्यक्षा लातूर येथील प्रतिभा कवेकर उपस्थित होत्या. त्यांनी येत्या काळात करण्यात येणाऱ्या कार्याविषयी माहिती दिली. शपथविधी अधिकारी पूर्व प्रांताध्यक्षा लता बनवट यांनी क्लबविषयी माहिती दिली. यानंतर नूतन अध्यक्षा दर्शना ललवाणी यांनी २५ महिलांना महिन्याभराचा किराणा, ३० गरजू महिलांना मास्क व साड्या दिल्या तर शनिमंदिरासह शहरातील १५० गरजू व्यक्तींना नाश्ता देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता कांकरिया यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उज्ज्वला मुथा, प्रेमलता खटोड, विमल रायसोनी, संगीता श्रीश्रीमाळ, किरण छोरीया, सुनीता ताथेड, चंद्रकला सुराणा यांनी सहकार्य केले. पदाधिकारी उपस्थित हाेते.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button