⁠ 
रविवार, मे 5, 2024

एरंडोल येथे लसीकरणासाठी नागरीकांची झुंबड

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । एरंडोल येथे डि.डि.एस.पी महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यासाठी एरंडोल ग्रामीण रूग्णालयातर्फे ६ मे  रोजी नियोजन करण्यात आले होते. नागरीकांनी पहाटेपासून डि. डि. एस. पी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मोठी गर्दी केली,सकाळी साडेआठ ते पावणेनऊ वाजेच्या सूमारास पोलिस व होमगार्ड यांनी रांगा करून नागरीकांना मध्ये सोडण्याचा प्रयत्न केला असता जमावाने जोरदारपणे प्रवेशद्वार लोटले व सर्वजण रांगेत नंबर लावण्यासाठी धावत सुटले यावेळी १ होमगार्ड गेट मध्ये दाबला जाणार होता माञ सुदैवाने बालबाल वाचला.

एरंडोल महाविद्यालयात सकाळी ९वाजेपासुन सायंकाळी ५वाजेपर्यंत २खोल्यांमध्ये लसीकरणाचे डोस वाटपाचे काम करण्यात आले.यावेळी कोविशिल्डचे ७४७ नागरीकांना डोसचा लाभ देण्यात आला. संसर्ग होऊ नये म्हणून ग्रामीण रूग्णालयाऐवजी एरंडोल महाविद्यालयात लसीकरण केंद्र हलविण्यात आले.याठिकाणी बँरीकेटींग,मंडप,चाचणी सुविधा आदी नियोजन करण्यात आले होते.

६दिवसांपासून लसींअभावी लसीकरण बंद होते म्हणून लोक लस घेण्यासाठी अगतिक झाले होते.

म्हणून प्रवेशद्वार उघडल्याबरोबर नागरीक नंबर लावण्याच्या प्रयत्नात पळत सुटले त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता परंतू पोलिसांनी स्थीती नियंत्रित करून लाभार्थ्यांच्या रांगा लावल्या,दिवसभर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप सातपुते,संतोष चौधरी,संदिप पाटील,सुनिल लोहार व होमगार्ड बांधव यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.

अतीउत्साहाच्या भरात एका आगंतुकाने आपणच लसी उपलब्ध करून दिल्या असे काही लाभार्थ्यांना भासविण्याच्या केविलवाण्या प्रकाराची चर्चा होत होती.