चोरीच्या उद्धेशाने फिरणारे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

एप्रिल 30, 2022 1:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । चोरीच्या उद्देशाने शहरात फिरणाऱ्या दोन संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून संशयितांकडून कार व चोरीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

crime 13 1 jpg webp

पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील एमआयडीसी पोलीसांचे पथक औद्योगिक वसाहत परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना अरविंद उर्फ आरु अरुण वाघोदे (वय २५,रा.सुप्रीम कॉलनी) व अनिल रमेश चौधरी (वय ४०,रा.अयोध्या नगर) हे दोघ संशयित संशयास्पदरित्या आढळून आले. पथकाने त्यांना थांबविले असता त्या दोघांनी याठिकाणाहून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अटक करीत त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहित्य व कार जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेले दोघंही संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. तसेच त्याच्यावर आतापर्यंत सुमारे १० घरफोडीवरील गुन्हे दाखल आहेत. अनिल चौधरी याने मुक्ताईनगरात झालेल्या घरफोडीत त्याचा सहभाग असल्याचे देखील समोर आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now