जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे, तामसवाडी, उपखेड, सायगाव, पिलखोड, पाटणा, तांबोळा, गणेशपूर या गावांमध्ये वीज चोरी केल्याप्रकरणी एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी एकूण साडेतीन लाख रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे.
महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने मीटरची तपासणी केली असता, अनधिकृतपणे विजेची चोरी केल्याचे निदर्शनास आले. वीज चोरीची रक्कम भरण्याच्या सूचना महावितरण कंपनीने संबंधितांना दिल्या होत्या. परंतु, दिलेल्या मुदतीत त्यांनी रक्कम भरली नाही. या प्रकरणी महावितरणचे पिलखोड कक्षाचे सहायक अभियंता सतीश राजपूत, महेश शेळके यांनी फिर्यादी दिली.
त्यावरून आनंद नथ्थू पाटील, रा.मांडूर्न. महेंद्र पाटील, अशोक पाटील, आनंदा देवराम पाटील (तिघे रा. तामसवाडी), विकास दिनकर मगर, दिलीप बारकू सूर्यवंशी (दोघे रा. उपखेड), शेख आयुब करीम, जुबेर मशीद अत्तर (दोघे रा. सायगाव), पंढरीनाथ पाटील, शरिफाबी मोहम्मद, सलीम खान समशेर खान (तिघे रा. -संदीप शेंडगे, पिलखोड), राजेंद्र मगन पाटील (पाटणा), भिकन चिंतामण पाटील, राजपूत तसेच गणेशपूर कक्षाचे रतन बाबुराव धनगर, रंजित बाबुराव कनिष्ठ अभियंता महेश शेळके यांनी पाटील, आबासाहेब रामप्रताप पाटील फिर्याद दिली. त्यावरुन आनंदा नथू (चौघे रा. तांबोळा), आनंदा डोंगरे पाटील (मांदुर्णे), महेंद्र जगन्नाथ (गणेशपूर) यांच्याविरुद्ध चाळीसगाव याप्रकरणी महावितरणचे पिलखोड पाटील, अशोक श्रावण पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.