शुक्रवार, डिसेंबर 8, 2023

प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन संपविले जीवन : पाचोऱ्यातील खळबळजनक घटना

जळगाव लाईव्ह न्यूज | 26 जून 2023 | पाचोरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील मोंढाळे रोड वरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पाचोरा शहरातील मोंढाळा रोड वरील रहिवाशी जितेंद्र राजु राठोड (वय – १९) व साक्षी सोमनाथ भोई – (वय -१८) या प्रेमीयुगुलाने मोंढाळे रस्त्यावरील एका पडक्या शाळेच्या खोलीत एकाच दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. मुलीचे नुकतेच लग्न झालं होते. ती माहेरी आली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिस काॅन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत जय मल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.