कजगावात यंदा कपाशीला मिळाला एवढा भाव?

सप्टेंबर 10, 2025 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या हंगामात कापसाला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यंदा तरी योग्य दर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. दरम्यान, भडगाव तालुक्यातील कजगावात यंदा कपाशीची खरेदी सुरु झाली आहे. प्रथम विक्रीसाठी कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. यंदा कपाशीला ६ हजार ९२५ रूपये एवढा भाव मिळाला आहे.

cotton jpg webp

कजगावसह परिसरात यंदा कपाशीची लागवड मागील वर्षांच्या तुलनेत कमी प्रमाणात करण्यात आली आहे. पावसाने सुरुवातीला दडी मारली असली, तरी नंतर ‘ब्रेक द बाद’ नंतरच्या पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात बागायती पद्धतीने करण्यात आलेल्या कपाशीची वेचणी आता सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी पहिला कापूस बाजारात विक्रीस आणला.

कजगाव हे तालुक्यातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून, येथील बाजारपेठ केळी व कपाशीच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील जवळपास ४० गावांतील शेतकरी आपल्या मालाची आवक या बाजारपेठेत करतात. या वर्षी कपाशीची लागवड कमी झाली असली, तरी काही शेतकऱ्यांनी मे महिन्यातच बागायती शेतात लागवड केल्याने काही प्रमाणात कापूस वेचणीस आला आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत पहिल्या वेचणीचा कापूस दिसू लागला आहे.

कपाशीची पहिली वेचणी असल्यामुळे शेतकरी ओला झालेला आणि लाल पडलेला कापूस विक्रीस आणत आहेत. ज्यांच्याकडे सुकविण्यासाठी जागेची सोय आहे, ते शेतकरी कापूस वाळवून चांगल्या भावाची प्रतीक्षा करत आहेत. अनंत चतुर्दशीच्या शुभदिनी कजगावातील व्यापारी जयप्रकाश अमृतकर आणि विकास अमृतकर यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला.

या सोहळ्याप्रसंगी अमृतकर यांनी प्रथम आलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर, काटा पूजन करून कापूस खरेदीची औपचारिक सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी ओला माल असल्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ६,९२५ रुपये इतका भाव दिला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now