⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावात शेतकऱ्याच्या कापसाला हमीभावही मिळेना; ‘या’ भावात केला जातोय खरेदी?

जळगावात शेतकऱ्याच्या कापसाला हमीभावही मिळेना; ‘या’ भावात केला जातोय खरेदी?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२४ । गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कापसाला भाव चांगला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. यातच बोदवड येथील शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी पैसे मिळत असल्याचं समोर आलं आहे. शेतात राबराब राबून, आसमानी संकटांना सामोरं जाऊन शेतकऱ्याचा जेव्हा कापूस घरात येतो तेव्हा त्याला हमीभाव सुद्धा मिळत नाहीय

खरंतर केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव वाढवल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तरी देकील हमीभावा इतका देखील भाव शेतकऱ्याच्या कापसाला मिळत नसेल तर यापेक्षा दुर्दैव गोष्ट कोणतीच असू शकत नाही. बोदवडमध्ये व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षाही कमी पैशात कापूस शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा प्रकारे मुजोरपणे शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकारचा अंकुश नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. .

शेतकऱ्यांना नेमका काय भाव मिळतोय?
सरासरी एक ते दीड वर्षापासून कापसाचे दर प्रति क्विंटल 7 हजारांच्या पुढे गेलेले नाही. केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठी कपाशीच्या हमीभावात ५०९ रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार सीसीआयने चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला. पण व्यापारी हमीभावापेक्षा कमी बोली लावत असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. सन २०१३ मध्ये कापसाला प्रति क्विंटल ७ हजार ५०० रुपये दर मिळत होता. आताही केवळ ६ ते ७ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस खरेदी केला जातो आहे.

कपाशीचे भाव वाढतील या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली. पण शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव कापूस विकावा लागतो आहे. व्यापारी मनमानी करून वाट्टेल त्या भावात कापूस खरेदी करत आहेत. केंद्राकडून चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर झाला. खासगी व्यापारी ६,५०० ते ६,९०० रुपये प्रति क्विंटल भाव देत असल्याने नुकसान होते आहे. इतर शेतमालाचे दरही हमी भावापेक्षा खासगी बाजारात कमी असून हमी भावावर शासनाचा किती अंकुश आहे? याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येतो आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.