भाजपा सरचिटणीस गोविंद शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धांचा सन्मान

एप्रिल 9, 2022 9:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गोविंद शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून त्यांना भेट वस्तू देण्यात आले.

sanman 6

यांचा सन्मान

बाळद-नेरी गणातील सर्व गावांमधील आरोग्य सेविका, आशा सेविका, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, पोस्टमन यांना देखील सन्मानचिन्ह देऊन भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला. तसेच या उपक्रमाचे अमोल शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.

या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, भाजपा भडगाव तालुका अध्यक्ष अमोल पाटील, भाजपा चिटणीस सोमनाथ पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेनेचे नगरसेवक शीतल सोमवंशी, सुभाष पाटील, बन्सीलाल पाटील, ओबीस जि. सरचिटणीस प्रदीप बापू पाटील, नंदू सोमवंशी, भाजपा उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी, महेश पाटील, ता.चिटणीस शरद पाटील व किशोर पाटील नगरदेवळा शहरअध्यक्ष नामदेव, नगरदेवळा ग्रामपंचायत सदस्य सुनील राऊळ, राजेंद्र पवार, राजेंद्र महाजन, संजय कुंभार, बापू चौधरी, विनोद परदेशी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद मित्र परिवार व सर्व नेरी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now