Jalgaon Corona Updates : जळगाव जिल्ह्यात आज नवे ४५१ कोरोना रूग्ण

फेब्रुवारी 18, 2022 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जानेवारी २०२२ | जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी चारशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात दिवसभरात तब्बल ४५१ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. तसेच आज जिल्ह्यात दिवसभरात २८५ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

corona

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच आहे. आज दिवसभरात ४५२ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बधितांची संख्या १ लाख ४६ हार ७०५ वर गेली आहे. तर त्यापैकी १ लाख ४१ हजार ९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३४ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८० रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-१५९, जळगाव ग्रामीण-३६, भुसावळ-५२, अमळनेर-१२, चोपडा-२१, पाचोरा-३, भडगाव-१२, धरणगाव-२०, यावल-१२, एरंडोल-२, जामनेर-२७, रावेर-७, पारोळा-१८, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-०, बोदवड-३४ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ४५१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now