जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी । जळगाव जिल्ह्यात काल कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली होती. मात्र, आज मंगळवारी नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज दिवसभरात तब्बल ४०९ कोरोना रुग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार ७८५ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ७२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५८० बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता २ हजार ४७८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत असून नागरीकांनी आपल्या सह आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात दिवसभरात ४०९ रूग्ण आढळून आले आहे. तर १८० रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. यात जळगाव शहर-१५९, जळगाव ग्रामीण-१८, भुसावळ १०६, अमळनेर-५, चोपडा-४३, पाचोरा-९, भडगाव-१३, धरणगाव-६, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-४, पारोळा-९, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-२० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४०९ बाधित रूग्ण आढळले आहे.
हेही वाचा :
- चीनमधील HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री; नागपुरात दोन रुग्ण आढळले, राज्य सरकार अलर्टवर
- जळगाव जिल्ह्यात कोरोनाची एंन्ट्री; एक जण कोरोना पॉझिटिव्ह
- सावधान! कोरोनानंतर आता ‘या’ धोकादायक आजाराचे जगात थैमान ; WHO कडून अलर्ट जारी
- वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय सुरू करावे ; शरद पवारांचा अशोक जैन यांना सल्ला
- धोक्याची घंटा! नव्या कोरोना व्हेरिएंट ‘इरिस’ची यूकेत लाट, भारतासाठी धोका?