⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगाव जिल्ह्यात कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांंच्या संख्येत घट, वाचा आकडेवारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२१ । जळगाव जिल्ह्यात कालच्या तुलनेत आज कोरोना बाधितांच्या संख्येत घट दिसून आलीय. आज दिवसभरात जिल्ह्यात २७० नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तसेच आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीय.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून आले. राज्यात महानगरांमध्ये तिसरी लाट डिसेंबर अखेर सुरू झाली असून जळगाव जिल्ह्यात या तिसऱ्या लाटेची तीव्रता वाढायला सुरुवात झाली आहे.

आज २७० रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४४ हजार १६२ गेली आहे. तर त्यापैकी १ लाख ४० हजार २९४ रुग्ण बरे देखील झाले आहे. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २५८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार २८८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

आज असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-६६, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१३७, चोपडा ८, पाचोरा १०, भडगाव- १, धरणगाव-३, यावल-१, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-४, पारोळा-१, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-१४ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण २७० रूग्ण आढळून आले आहे.

हे देखील वाचा :