आरोग्यकोरोनासामाजिक

मोठी बातमी : कोविड १९ बदद्ल जागतिक आरोग्य संघटनेची महत्वाची घोषणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ मे २०२३ |  संपूर्ण जिल्ह्यासह जगात हैदोस घातलेल्या कोरोनाच्या साथी संधर्बात जागतिक आरोग्य संघटनेने मोठी घोषणा केली आहे. केलेल्या या घोषणेमुळे नागरिकांना सुखद धक्का बसणार आहे. कोरोनाची म्हणजेच कोविड १९ विषाणूची साथ संपली असल्याची मोठी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.

कोरोनाचा तो काळ आठवला तरी नागरिकांना नकोसे वाटते. कारण त्यावेळी लादण्यात आलेले कडक लॉकडाऊन आणि जीवाची भीती यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. कोरोनामुळे अनेकांचे संसार अर्ध्यातच उद्वस्त झाले. अनेकांचे जवळचे नातेवाईक सोडून गेले. यामुळे तो काळ नागरिकांना खूप काही शिकवून गेला मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची साथ संपली असल्याची घोषणा केली आहे.

कोरोनाने अवघ्या देशात अराजकता माजवली होता. परंतु आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची साथ संपली असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रत्येकालाच कोरोनापासूनच्या सुटकेचा निश्वास सोडता येणार आहे.

Related Articles

Back to top button