जळगाव लाईव्ह न्यूज । बीड जिल्ह्यातील घटनेपाठोपाठ आता जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे ४३ वर्षीय स्वयंपाक्याला हात बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हॉटेलमध्ये चोरी केल्याच्या आरोपाखाली ही मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह वेगवगेळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. संदेश बुंदेले (वय २४), मनीष वंजारी (वय २७, रा.वंजारी वाडा, बोदवड) असं अटक केलेल्या दोघांचे नाव आहे.

आईसह जामठी (ता. बोदवड) येथे राहणारे भागवत ओंकार शिंदे हे स्वयंपाकी किंवा मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते सध्या शहरातील मलकापूर रोडवरील राजवीर हॉटेलमध्ये कामाला आहेत. दरम्यान, १८ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शिंदे हे राजवीर हॉटेलमध्ये काम करत असताना संदेश अरुण बुंदेले हा तेथे आला. शिंदे हे सहा महिन्यांपूर्वी याच बुंदिलेच्या जामनेर रोडवरील साकी हॉटेलमध्ये कामाला होते. त्यामुळे दोघे एकमेकांना ओळतात. यानंतर संदेश हा शिंदेला दुचाकीवर बसवून त्याच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्याचा चुलतभाऊ मनीष वंजारी हा उपस्थित होता.
संदेश व मनीषने तू आमच्या हॉटेलमध्ये कामाला असताना खूपवेळा चोरी केल्याचा आरोप केला. संदेशने शिंदेचे हात बांधून व कपडे काढून पाठीवर चापट-बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. मनीषने खाट विणण्याच्या दोरीने पायावर एकामागून एक फटके मारले. जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी तेथे वैभव व कल्पेश (पूर्ण नाव माहिती नाही) दे दोघे तेथे आले.त्यांनी दोरीने पाठ, पोट व हातापायांवर फटके मारले.
बेदम मारहाण होत असताना शिंदे चौघांकडे सोडून देण्याची विनंती केली. त्यासाठी हातापाया पडल्या. पण त्यांनी काही एक ऐकून न घेतला दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डांबून ठेवत मारहाण. सायंकाळी त्यांच्या ताब्यातून कसाबसा सुटलेल्या शिंदेने थेट बोदवड पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी संदेश बुंदेले, मनीष वंजारी या दोघांना अटक केली. २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. तपास डीवायएसपी राजकुमार शिंदे हे करत आहेत.