⁠ 
शनिवार, मे 4, 2024

जि.प.च्या शिक्षण उपक्रमात उर्दू शिक्षकांचे योगदान कौतुकास्पद ; जिप अध्यक्षा सौ.रंजनाताई पाटील

 जळगाव लाईव्ह न्यूज । ३१  जुलै २०२१ । जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात काम करीत असतांना सर्व शिक्षक महत्वपूर्ण योगदान देत आहे. त्यांच्या योगदानातून आपला जिल्हा आपले उपक्रमाचा पाचवा भाग प्रकाशित झाला असून यात उर्दू शिक्षकांचा सहभाग अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिप अध्यक्षा सौ रंजनाताई पाटील यांनी प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले.

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षांचे दालनात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून जिप अध्यक्षा ना.श्रीमती रंजनाताई पाटील या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिप उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण सभापती  रविंद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपालसिंग बोदडे, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील, उप  मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, माध्य. शिक्षणाधिकारी बी. एस. पाटील, उप शिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, एजाज शेख, खलील शेख,, पुस्तक निर्मिती व संकलनकर्त्या गज़ाला तबस्सुम, समन्वयक कमालोद्दिन शेख,  श्रीमती कल्पना पाटील, दीपक नगरे, श्रीमती कल्पना नगरे यांच्यासह जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते.

प्रास्ताविक करतांना गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्याची शैक्षणिक, बौद्धिक पातळी  उंचावण्यासाठी अनेक शिक्षकांनी परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या विचारांची देवाण  घेवाण होऊन त्यांचे उपक्रमांना सामाजिक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी संपूर्ण विचारांचा डिजिटल संग्रह प्रकाशित करण्यात आला असून पाचव्या भागाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन गजाला तबस्सुम यांनी केले तर आभार सौ कल्पना पाटील यांनी मानले.

यांनीही केले कौतुक

जिल्हाधिकारी.अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन एस चव्हाण यांना संबंधित शिक्षकांनी पुस्तक भेट दिले असता त्याचे अवलोकन करून सर्व अधिकारी वर्गाने या उपक्रमाचे कौतुक करून गजाला तबस्सुम यांचे व सहकार्यांचा गौरव केला. यावेळी सहकारी शिक्षक आरीफ खान, डॉ साबीर खान, जामनेर, मोहसिन खान, रिज़वान शेख,सैय्यद सुमैरा आरिफ खान, साकळी, नईम पठाण, रियाज अहमद, जळगाव  आदि उपस्थित होते.